अमरावती - जिल्हातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे एका महिलेची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर सदर आरोपी पसार झाला. दरम्यान मागील पंधरा दिवसात हत्येची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.
हेही वाचा... वाडिया रुग्णालयाच्या भूखंडावर बड्या अधिकाऱ्यांचा डोळा - प्रविण दरेकर
चांदुर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे भरदिवसा महिलेची हत्या करण्यात आली. संगीता झटाले (४o) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला घरी एकटी असताना अचानक घरात घुसून एका अज्ञाताने संगीता यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा... निर्भया प्रकरण : आरोपींना एक फेब्रुवारीला होणार फाशी
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अज्ञात व्यक्ती विरोधात चांदुर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र भरदिवसा हत्या करणाऱ्या या आरोपीला पोलीस अटक करू शकलेले नाही. अमरावतीतील मागील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे.