अमरावती - संपूर्ण प्रकरण हमालपुरा परिसरातील युवतीला मुस्लिम युवकाने पळून नेल्यामुळे शहरात खळबळ ( Amravati Love Jihad Case ) उडाली. आज विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजापेठ पोलिसांना धडकले. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी युवकाला अटक केली मात्र युवती नेमकी कुठे आहे. याबाबत भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांना विचारले जात असतानाच खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) ह्या देखील राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी पोलीस निरीक्षक ठाकरे ( Police Inspector Thackeray ) यांना मुस्लिम युवकाने हिंदू युवतीला पळून नेले या प्रकरणात तुम्ही युवकाला अटक केली मात्र आमची मुलगी कुठे आहे? असा प्रश्न केला आहे.
Amravati Love Jihad Case : नवनीत राणाने राडा घातलेले लव्ह जिहादचे नेमके प्रकरण आहे तरी काय? - पोलीस निरीक्षक ठाकरे
अमरावतीत आंतरधर्मीय विवाहाच्या मुद्द्यावरुन चांगचाल गोंधळ झाला ( Amravati Love Jihad Case ) आहे. येथे एका मुलीला पळवून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना थेट पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारला. तर भाजप खासदार अनिल बोंडेंही याप्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी या प्रकरणी अनेक सनसनाटी दावे केले आहेत. तर पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
![Amravati Love Jihad Case : नवनीत राणाने राडा घातलेले लव्ह जिहादचे नेमके प्रकरण आहे तरी काय? Navneet Rana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16306522-thumbnail-3x2-rana.jpg)
पोलीस निरीक्षक आणि खासदार नवनीत राणा यांच्यात बाचाबाची - यावेळी पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा यांची आपल्या मोबाईल फोन मध्ये शूटिंग घेणे सुरू केले असताना खासदार नवनीत राणा यांनी माझी रेकॉर्डिंग का करता असा प्रश्न पोलीस निरीक्षकांना विचारला. यानंतर पोलीस निरीक्षक आणि खासदार नवनीत राणा यांच्या बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आक्रमक होत पोलीस निरीक्षकांच्या जालनात असलेले भाजप आणि विश्व हिंदू परिषदेसह युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. तसेच पत्रकारांना देखील बाहेर काढले. यानंतर सुमारे अर्धा तासापर्यंत खासदार नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू होती. दोन तासात मुलगी आमच्यासमोर हजर करा अमरावती जिल्ह्यात लहुजी आजचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असून हा अतिशय गंभीर प्रकार असून पोलिसांनी या गंभीर विषयाकडे लक्ष न देता केवळ टोलवाटोलवी सुरू केली आहे. असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.पोलिसांनी युवकाला 15 तासांपूर्वी अटक केली. मात्र आमची मुलगी नेमकी कुठे आहे याचा शोध मात्र पोलीस घेऊ शकले नाहीत. आता दोन तासात आमची मुलगी भेटली नाही तर याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.
माझं फोन रेकॉर्डिंग का केले - अमरावती नुकतेच आंतरधर्मीय लग्न झालेल्या हिंदू मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवलं आहे. Love Jihad in Amravati पीडित मुलीच्या कुटुंबियांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये Rajapeth Police Station आणावं. पोलीस या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का करतायेत, असा सवाल करत खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. MP Navneet Rana Make Argument तसेच त्यांचा फोन कॉल पोलीस ठाणेदाराने रेकॉर्ड केल्याने कोणत्या अधिकारात तुम्ही माझा फोन रेकॉर्ड केला अशी विचारणा करत त्या पोलिसांवर भडकल्या. जवळपास २० मिनिटे हा राडा सुरु होता. यावरुन माझं फोन रेकॉर्डिंग का केले असल्याचा सवाल खासदार नवनीत राणांनी पोलिसांना केले आहे.