अमरावती - यावर्षी राज्याच्या काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी पश्चिम विदर्भातील ५ जिल्ह्यातील जलसाठा प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत आजही ८ टक्के तूट असल्याचे समोर आले आहे. अमरावती विभागातील ५ जिल्ह्यात एकूण ५०२ पाणी प्रकल्प आहे. यामध्ये मोठे ९, मध्यम २४ तर, लघु ४६९ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पात मिळुन सध्या ४४% पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ५२% होता. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे, असे बोलले जात असले तरी पाणी साठ्यात ८% तूट दिसून येत आहे.
अमरावती विभागाच्या ५ जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात 44 टक्के जलसाठा; ८ टक्के जलसाठ्याची तूट - पाऊस पश्चिम विदर्भात झाला नाही
पश्चिम विदर्भात येणाऱ्या अमरावती विभागातील ९ मोठ्या प्रकल्पात जलसाठा हा ४३.४९% इतका आहे. यातील यवतमाळमधील बेंबळा, अकोलामधील वाण, बुलढाणामधील पेनटाकळी हे तीन प्रकल्प वगळता उर्वरित ६ प्रकल्प हे ५०% च्या पुढे अद्यापही गेलेले नाहीत. बुलढाण्यातील खडकपूर्णा या धरणातील जलसाठा 00% इतका आहे.
पश्चिम विदर्भात येणाऱ्या अमरावती विभागातील ९ मोठया प्रकल्पात जलसाठा हा ४३.४९% इतका आहे. यातील यवतमाळमधील बेंबळा, अकोल्यातील वाण, बुलडाण्यातील पेनटाकळी हे ३ प्रकल्प वगळता उर्वरित सहा प्रकल्प हे ५०% च्या पुढे अद्यापही गेलेले नाहीत. बुलडाण्यातील खडकपूर्णा या धरणातील जलसाठा 00% इतका आहे. अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात ९.२३% इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी पावसाचे आगमन आधीच एक महिना उशिरा झाले. त्यात आता पावसाळ्याचा ऋतु काही दिवसच राहणार आहे. उर्वरित दिवसात जर जोरदार पाऊस पश्चिम विदर्भात झाला नाही, तर पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. भर पावसातही विभागातील अनेक गावांत पाणीटंचाई कायम आहे.