अमरावती -काही विशिष्ट राजकीय लोकांना महापालिका निवडणूक जिंकण्याचा लाभ मिळावा, या हेतूने अमरावती शहरातील प्रभाग (Amravati City Ward formation) रचना करण्यात आली असल्याचा आरोप आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार राणा यांनी मुंबई राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान (UPS Madan) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार दिली आहे.
'नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचा डाव' -
ज्या काही विशिष्ट राजकीय व्यक्तींच्या हितासाठी महापालिका प्रशासनाने (Muncipal Corporation Election) येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभागाची रचना केली आहे. ही अशी रचना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना महत्त्वाच्या सुविधांपासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचे निदर्शनास येत आहे, असे आमदार रवी राणा यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याबाबतही आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयुक्तांकडे रोष व्यक्त केला आहे.
'कारवाई करण्याची केली मागणी' -