अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ( Sant Gadge Baba Amravati University ) परीक्षा ऑफलाइन घ्यावी की ऑनलाईन घ्यावी, यासंदर्भात विद्यार्थ्यांचे अनेक आंदोलन झाले. आता परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असतानाच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ( Amravati University Exam ) या कुठल्या पद्धतीने होतील. याबाबतचा निर्णय कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे.
आमदार राणा यांनी घेतली कुलगुरूंची भेट - जळगाव, नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ याप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बहुपर्यायी पद्धतीने परिक्षा घ्यावी. या मागणीसाठी काँग्रेस भाजप युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार रवी राणा यांनी विद्यार्थ्यांची बाजू कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्यासमोर मांडली. कुलगुरूंनी यावेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी विद्यापीठाची भूमिका असून शासनाच्या निर्णयाप्रमाणे आणि परीक्षा संदर्भात निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली.