अमरावती -शहारातील आदर्श शाळेत बाल वैज्ञानिकांनी विविध अफलातून प्रयोग साकरले आहेत. यामध्ये त्यांनी सौर उर्जेवर धावणारी ऑटोरिक्षा, घरातील सर्वसाधारण काम करणारा रोबोट, इलेक्ट्रॉनिक शार्पनर, घर बंद असताना घराचे संरक्षण होईल अशी व्यवस्था असे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
अमरावतीच्या आदर्श शाळेत बाल वैज्ञानिकांनी साकारले अफलातून प्रयोग हेही वाचा -दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्येही कडेकोट पोलीस बंदोबस्त
अमरावतीच्या थापडे परिसरातील आदर्श माध्यमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये दडलेला वैज्ञानिक बाहेर यावा यानिमित्ताने वैज्ञानिक प्रयोगांचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. घरातील अधिक टाकाऊ वस्तु पासून विद्यार्थ्यांनी रोबोट, सौर उर्जेवर चालणारी ऑटोरिक्षा, धूर नियंत्रण उपकरण आधी प्रयोग या प्रदर्शनात सादर केले. विज्ञाननिष्ठ माहिती असणारे भित्तीपत्रके यावेळी विज्ञान प्रदर्शनाच्या स्थळी लावण्यात आले होते. आदर्श शाळेच्या अध्यक्ष स्नेहलता महाजन आणि सचिव संध्या मराठे यांनी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. चिमुकल्यांनी साकारलेल्या विविध प्रयोगांचे परीक्षण वृंदा मराठे यांनी केले. विद्यार्थ्यांनी अतिशय हौशीने साकारलेल्या प्रयोगांची माहिती ते प्रयोग पाहणाऱ्या प्रत्येकाला देत होते. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल वेरुळकर, विज्ञान शिक्षिका अश्विनी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी राधिका सिद्धभट्टी, किर्ती कोहळे, रूपाली जोशी, शितल केने, भावना खडसे यांनी सहकार्य केले.
हेही वाचा -'प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राध्यापकांचे निलंबन मागे घ्या'