महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावती जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; लसीकरण केंद्रावर शुकशुकाट - Amravati District Corona Vaccination Update

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक लागला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळत आहे.

लसीकरण केंद्रावर शुकशुकाट
लसीकरण केंद्रावर शुकशुकाट

By

Published : May 18, 2021, 11:02 AM IST

अमरावती: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा कायम आहे. अमरावती जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून लसींचा पूरवठा न झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्राला टाळे लागले आहेत. तर अमरावती शहरात महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ११ ही लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे सर्व लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर अनेक नागरीक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येत आहे. परंतु लसच उपलब्ध नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे.

अमरावती जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर शुकशुकाट

ग्रामीण भागातील तब्बल १०० लसीकरण केंद्र बंद

अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जवळपास १२५ लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. तर महानगरपालिका अंतर्गत अमरावती शहरात ११ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारले आहे. पण लस नसल्याने पुन्हा एकदा शहरातील सर्वच, तर ग्रामीण भागातील तबल १०० लसीकरण केन्द्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना लस मिळणे कठीण झाले आहे. ज्या लोकांनी दिड महिन्यांपूर्वी लस टोचून घेतली, त्या लोकांच्या दुसऱ्या डोसची वेळ आली आहे. परंतु दूसरा डोस केव्हा मिळणार ही प्रतीक्षा त्यांना लागली आहे. तर १८ -४५ वयोगटातील नागरीक हे देखील लसीच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा -यूपी सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यांची 'ईटीव्ही भारत'कडून पोलखोल..

ABOUT THE AUTHOR

...view details