अमरावती -21 जून रोजी उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे हत्या झाल्याचें स्पष्ट झाले आहे आता. या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात आलेला. उमेश कोल्हे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे या अहवालानुसार उमेश कोल्हे यांचा मानेच्या डाव्या बाजूला जुगुलर वेन आणि कॅरोटीन आर्टरी कापल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मानेच्या डाव्या बाजूला 8 बाय 2 इंच जखम झाली होती. त्यामुळे मेंदूला जाणारा रक्तपुरवठा बंद झाल्याने उमेश कोल्हे यांचा मृत्यू झाला. आहे.
21 जूनला झाली हत्या -21 जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील घंटी घड्याळ परिसरात तिघा जणांनी उमेश कोल्हे यांच्यावर हल्ला केला होता. हत्याऱ्यांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला होता. या घटनेमुळे अमरावती शहरात प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी अटक केली असून या गंभीर प्रकरणाचा तपास आता एनआयए करीत आहे.
दरम्यान, अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली ( Amravati Chemist Murder ) होती. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं ही हत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केलं ( Umesh Kolhe Murder Case Due Post About Nupur Sharma ) आहे. तसेच, उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास अमरावती पोलिसच करत असल्याचेही साळी ( DCP Vikram Sali ) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गळा चिरुन हत्या -शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. त्याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. 'अटक केलेल्या आरोपींकडे हत्येचा हेतू स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करीत आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर ही हत्या या प्रकाराचीच संबंधित असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले,' असे उपायुक्त साळी यांनी म्हटलं आहे.