अमरावती - उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder ) लुटमारीसाठी झाल्याचे दिसून येत नाही. आरोपीने लुटमारीसाठी चाकूचा वापर केला असता, तर तो त्याच्याकडील सामान व पैसे घेऊन पळून गेला असता. शिवाय या खून प्रकरणात पकडलेले आरोपींची पूर्वी कुख्यात म्हणून ओळख पटलेली नाही. मोठ्या चायनीज चाकूने त्याच्या गळ्यात वार करण्याऐवजी त्यांनी भीतीपोटी पैसे चोरण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, ही हत्या लुटमारीसाठी झालेली नाही त्यामुळे केंद्रिय यंत्रणांच्याकडून चौकशी करण्याची मागणी रवी राणा ( MP Ravi Rana ) यांनी केला आहे.
केंद्रिय यंत्रणांच्याकडून चौकशीची मागणी -कोल्हे यांच्या कुटुंबीयांनीही या घटनेबाबत सांगताना याच गोष्टी नमूद केल्या आहेत. या घटनेसंर्दभात त्यामुळे हा खून लुटमारीच्या कारणामुळे झाला असे नाही. खा. नवनीत राणांचे पती रवी राणा यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोपींनी पैसे चोरण्यासाठी हे कृत्य केल्याचे दिसत नाही असे राणा म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद (२४) रा. मौलाना आझाद कॉलनी, मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम (२२) रा. बिसमिल्लानगर, शाहरूख पठाण हिदायत खान (२४) रा. सुफियाननगर, अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम (२४) रा. बिसमिल्लानगर व शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२) रा. यास्मीननगर यांना अटक करण्यात आली आहे.