अमरावती -अमरावती शहरातील ( NIA in amravati news ) औषधी विक्रेते उमेश कोल्हे हत्या ( Umesh Kolhe murder case ) प्रकरणातील सात आरोपींना अमरावती पोलिसांकडून ताब्यात घेण्यासाठी एनआयएचे पथक ( NIA in amravati news ) शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. कोल्हे कुटुंबातील एक सदस्य देखील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात उपस्थित असून सध्या एनआयए ( Umesh Kolhe murder case accuse ) शहर कोतवाली पोलिसांसह कोल्हे कुटुंबातील सदस्यांकडून महत्वपूर्ण माहिती घेत आहे.
हेही वाचा -Umesh Kolhe Murder Case : नुपूर शर्मांच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्यांना धमकी; ऑडिओ क्लिप आली समोर
आरोपींना आठ जुलैला एनआयए न्यायालयासमोर हजर करणार -औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट शेख इरफान शेख रहीम याने रचला होता. अमरावती पोलिसांनी या प्रकरणात शेख इरफान शेख रहीम याच्यासह डॉक्टर युसुफ खान, शोएब खान, मूदलिस अहमद, अतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण, शेख इब्राहिम अशा सात जणांना अटक केली आहे. या सर्व सात जणांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. एनआयएने या सातही आरोपींना आपल्याकडे सुपूर्द करावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या सातही आरोपींना एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिलेत. आठ जुलै पर्यंत हे सातही आरोपी एनआयएच्या कस्टडीत राहणार असून, आठ जुलैला त्यांना मुंबई येथील एनआयए च्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज या सातही आरोपींना एनआयएचे पथक मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना एनआयएचे पथक आज मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असून, यासाठी पोलिसांची मोठी व्हॅन शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात सज्ज आहे. आरोपींना शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाहेर काढताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ केली होती पोस्ट : पशूंच्या औषधांचे विक्रीचे दुकान उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युनूफ खान याने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.