अमरावती औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी Umesh Kolhe Murder Case फरार असलेला आरोपी शमीम अहमद उर्फ फिरोज अहमद Accused Shamim Ahmed याची माहिती देणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयए दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा एनआयएने आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे.
नुपूर शर्माच्या समर्थनात पोस्ट केल्याने झाली होती हत्त्यावादग्रस्त नुपूर शर्माच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. ५४ वर्षीय उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची गेल्या २१ जून रोजी हत्या झाली होती. Amravati Umesh Kolhe Murder Case अमरावती पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. उमेश कोल्हे हे दुकान बंद करून दुचाकीवर घरी परतत असताना ही घटना घडली होती. उमेश कोल्हे हे महिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच हल्लेखोरांनी दुचाकीवरून उतरून उमेश यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात उमेश रस्त्यावर पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
दहा जणांना अटकएनआयएने २ जुलै रोजी गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण्यासाठी), ३०२ (हत्या ), १५३ अ (धर्म, जात, स्थळाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत असून आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. शमीम अहमद मात्र अद्यापही फरार आहे.
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून...भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली होती. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपासानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला.