अमरावती - येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण ( Umesh Kolhe Murder Case) देशपातळीवर गाजत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे आहे. या खून प्रकरणी दररोज नवनविन खुलासे होत आहेत. मात्र या साऱ्या प्रकरणात कुटुंबियांचे ( Umesh Kolhe Family ) सांत्वन करण्यासाठी येणाऱ्याकडून मनस्ताप होत असून, माझ्या भावाच्या हत्येचा इव्हेंट करू नका, अशी भावना महेश कोल्हे यांनी व्यक्त केली.
खुनाचा तपास एनआयएकडे (NIA) जाताच जिल्ह्याचे नाव देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यामुळे कोल्हे कुटुंबियांकडे भेट देनाऱ्याची संख्या अचानकपणे वाढली. देशपातळीवरील नेत्यांपासुन, आमदार, खासदार एवढेच नव्हे तर, अभिनेत्यांनी सुद्धा हजेरी लावली आहे. माझा भाऊ उमेशला जाऊन आज १७ दिवस झाले आहेत. कुटुंबावर दुःखाचा ( Umesh Kolhe Family ) डोंगर कोसळला आहे. अशातच काही संस्था, संघटना घरी येऊन आमच्याच भावाच्या श्रद्धांजली सभेचे निमंत्रण देऊन उपस्थित राहण्यासाठी आग्रह धरत आहे. यामुळे कुटुंबातील सर्वानाच खूप त्रास, सहन करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यापुढे श्रद्धांजली सभा, कार्यक्रम घ्या. पण, आम्हाला येण्याचा आग्रह करू नका. असे, आवाहन महेश कोल्हे यांनी केले.
काय आहे प्रकरण -नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे ( Nupur Sharma Social media Post) अमरावती शहरातील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे ( Pharmacist Umesh Kolhe ) यांची 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजता घंटी घड्याळ परिसरात हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात एकूण सात जणांना ( seven arrested Umesh Kolhe murder case ) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास आता अमरावती पोलिसांकडून एएनआयकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान अमरावती शहरात एकूण तीन व्यक्तींना नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे धमकी मिळाली असल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रामपुरी कॅम्प परिसरातील या व्यक्तीला दिवसभर एका पोलिसाचे संरक्षण देण्यात आले. शुक्रवारी रात्री ही व्यक्ती आपल्या दुकानातून घरी पोहोचली असताना त्यांच्या घराची सहा जणांनी रेकी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या संरक्षणासाठी असणारा पोलीस कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाला असताना त्याला एकूण सहा जण संशयित्रीच्या तक्रारदार व्यक्तीच्या घराच्या परिसरात दिसले. या सहाही व्यक्तींची हालचाल संशयास्पद असल्याचे, कळतात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना सूचित केले.