महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 17, 2022, 5:26 PM IST

Updated : Apr 17, 2022, 5:36 PM IST

ETV Bharat / city

Uday Samant Replied To Navneet Rana : 'मातोश्री सोडा, आधी अमरावतीतील शाखा प्रमुखांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणून दाखवा'

खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्यासाठी मातोश्रीचा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत हनुमान चालीसासाठी ( Navneet Rana Hanuman Chalisa Statement ) तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात, ते बघावं, असं आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Uday Samant Replied To Navneet Rana ) यांनी दिलं आहे.

Uday Samant Replied To Navneet Rana
Uday Samant Replied To Navneet Rana

रत्नागिरी -खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्यासाठी मातोश्रीचा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत हनुमान चालीसासाठी तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात, ते बघावं, असं आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Uday Samant Replied To Navneet Rana ) यांनी दिलं आहे. शिवाय ज्यांना राजकीय संस्कृती नाही त्यावर का बोलायचं? असं देखील यावेळी सामंत म्हणले.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

राणा दाम्पत्यांनी नेमकं काय म्हटलं? -मला मुंबईत येऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांनी मला मुंबईत कधी यायचे, याची तारीख सांगावी. मी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावणार आहे, मी स्वतः मुंबईची मुलगी असून आज विदर्भाची सून आहे. आज त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असेल, तर माझ्याकडे विदर्भाची संपूर्ण ताकद असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाहीतर आम्ही हनुमान जयंती नंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता.

फडणवीसांबाबतच्या ट्वीटवर दिलं स्पष्टीकरण -उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या ट्विटबाबत म्हणाले की, माझ्या ट्विटचा निशाणा कुणावरही नाही. भाजपासोबत असलेल्या इतर पक्षांची कोल्हापूरच्या निवडणुकीत मते नाहीत का? याच अर्थाने मी ट्विट केल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण शिवसैनिक हा आदेश मानणारा असतो. मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला त्याचं तंतोतंत पालन शिवसैनिकांनी केलं. तसेच महाविकास आघाडीच्या सर्वच मित्रपक्षांनी केलं, म्हणूनच हा मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -Navneet Rana Criticized Shivsena : 'राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचे प्रतिबिंब दिसते, लवकरच ते उद्धव ठाकरेंची जागा घेणार'

Last Updated : Apr 17, 2022, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details