अमरावती - शहरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक वृद्ध महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून एक 20 वर्षीय तरुण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीत आता कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली आहे.
अमरावतीत आढळले आणखी दोन कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 10 वर - corona virus news
अमरावतीत आता कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली आहे.
मृत कोरोनाग्रस्त महिला ही पाटीपुरा परिसरातील असून 20 वर्षीय तरुण हा हैदरपुरा परिसरातील रहिवासी आहे. रात्री 12 वाजेपर्यंत या दोघांच्या कुटुंबतील सदस्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी कोविड रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी कोविड रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
अमरावतीत पहिला कोरोनाग्रस्त 3 एप्रिलला आढळला होता. त्यानंतर 7 एप्रिलला 3 आणि 12 एप्रिलला 1, 18 एप्रिलला एक आणि 22 एप्रिलला 2 मृत महिला या कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. आता गुरुवारी रात्री आणखी दोघे कोरोनाग्रस्त समोर आल्याने अमरावती शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने आता कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.