अमरावती - शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील लालखाडी परिसरात दुपारच्या सुमारास अब्दुल तौहीद या व्यक्तीवर चाकू आणि तलवारीने हल्ला झाला. संबंधित हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अमरावतीत भर दुपारी खून, तीन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटनेत हत्या - अमरावती क्राइम
शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील लालखाडी परिसरात दुपारच्या सुमारास अब्दुल तौहीद या व्यक्तीवर चाकू आणि तलवारीने हल्ला झाला. संबंधित हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
या हल्ल्यात अब्दुल तौहीदचा मृत्यू झाला असून अब्दुल राजिक व अब्दुल नईम हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून नागपुरी गेट पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले आहे. दोन्ही जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तीन दिवसांआधी तिवसा येथे जनता कर्फ्युच्या दिवशी एका युवकाची अवैध धंद्यातून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलीस या दोन्ही घटनांतील आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.