अमरावती :बडनेरा लगत असणाऱ्या दडबड शहा दर्गा परिसरात (Darbad Shah Dargah murder Badnera) गुरुवारी रात्री गडबड शहा येथील मुजावर अर्थात पुजारी अन्वर बेग अकबर बेग आणि दर्ग्यावरच काम करणारा तोफिक शेख राजीक शेख या दोघांची धारदार सुरा मारून हत्या झाली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा (Amravati Crime Branch) आणि लोणी पोलिसांनी (Loni Police) दोन आरोपींना अटक केली (Two arrested in Darbad Shah Dargah murder case) आहे. लक्ष्मण पिंपळे (राहणार- तळोजा, जिल्हा नंदुरबार) आणि दीपक पवार (राहणार- बैलोलपूर तालुका, नांदगाव खंडेश्वर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
असे आहे संपूर्ण प्रकरण-दडबड शहा दर्गा येथे गुरुवारी पहाटे दर्ग्यावरील मुजावर अन्वर बेग अकबर बेग आणि दर्ग्यावरच काम करणारा तौफिक शेख राजीक शेख या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या देखील तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. बडनेरा पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले होते. या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असताना मूळ घटनास्थळ हे अमरावती ग्रामीण मध्ये येणाऱ्या लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांसह लोणी पोलिसांच्या दोन पथकांनी केला.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले हत्येचे कारण- या संपूर्ण घटने संदर्भात आज अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी माहिती दिली. नंदुरबार तालुक्यातील तळोजा येथील रहिवासी असणारा लक्ष्मण पिंपळे हा दहा वर्षांपूर्वी अमरावतीत आला. तो सुरुवातीला मालधक्क्यावर काम करायचा. त्यानंतर पाच ते सहा वर्षांपूर्वी तो दडबड चहा दर्गा येथे काम करायला लागला. या ठिकाणी येणाऱ्या हिंदू ,मुस्लिम भाविकांकडून तो दक्षिणा घ्यायचा. मात्र सहा ते सात महिन्यांपूर्वी या दर्ग्यावर अमरावती शहरातील लाल कडी परिसरातील रहिवासी अनवर बेग अकबर बोग हा अधिकृत मुजावर म्हणून दर्ग्यावर नियुक्त झाला. त्याने लक्ष्मण पिंपळे याला दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांकडून दक्षिणा घेऊ नये यासाठी टोकले आणि दर्ग्यावरून हुसकावून लावले. दर्ग्यावरील काम संपुष्टात आल्यावर लक्ष्मण पिंपळे हा तीन महिन्यापूर्वी नंदुरबार तालुक्यातील तळोजा ह्या त्याच्या मूळ गावी परतला होता. मात्र त्याच्या मनात अन्वर बेग अकबर बेग याच्याबाबत राग खदखदत असल्यामुळे तो आठ पंधरा दिवसांपूर्वी अमरावतीत परतला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बैलोलपूर पारधी बेड्यावर राहणारा दीपक पवार या मित्राला घेऊन तो बुधवारी रात्री दडबड शहा दर्गा परिसरात पोहोचला.
दडबड शहा दर्गा येथील हत्याकांड प्रकरणाविषयी माहिती देताना अमरावती येथील पोलील अधीक्षक अविनाश बारगळ धारदार सुऱ्याने वार करून दोघांनाही संपविले-रात्री दोघांनीही या परिसरात जेवण केल्यावर पहाटे दोनच्या सुमारास दोघेही दडबड शहा दर्गा परिसरात पोहोचले. या ठिकाणी गाढ झोपेत असणारा अन्वर बॅग अकबर बेग याच्यावर दोघांनीही धारदार सुऱ्याने वार केलेत. यावेळी अन्वर बेग अकबर बेग याच्या आवाजामुळे याच परिसरात झोपलेला तौफिक शेख राजीक शेख झोपेतून उठला. अन्वर बॅग अकबर बेगला मारत असताना तौफिकने पाहिल्यामुळे लक्ष्मण पिंपळे आणि दीपक पवार यांनी तौफिक शेखची देखील हत्या केली असे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले.