अमरावती - शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची 21 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता श्याम चौक लगत घंटी घड्याळ परिसरात निर्घृण हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) करण्यात आली होती. त्यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा ( Former BJP Spokesperson Nupur Sharma ) यांच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे उघड आहे. अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली आहे. कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकमल चौकात सोमवारी अकरा वाजता अमरावतीकर उपस्थित राहणार आहेत.
खासदार अनिल बोंडेंनी केले श्रद्धांजली सभेचे आयोजन -अमरावती शहरात शांतता नांदावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने राजकमल चौक येथे उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता अमरावतीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अनिल बोंडे ( MP Anil Munde ) यांनी केले आहे. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो या श्रद्धांजली सभेला मी उपस्थित राहणार आहे. अमरावतीकरांनी देखील राजकमल चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे.