अमरावती - आडवळणाचा रस्ता, सर्वत्र हिरवळ, मोठमोठ्या पर्वतरांगा, या अदभूत निसर्गरम्य वातावरणाचा आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी ( New Year 2022 ) पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणारं चिखलदरा ( Chikhaldara ) फुलून गेले आहे. सध्या राज्यात थंडीची लाट सुरू असून चिखलदरामध्ये थंडीने उच्चांक गाठला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून पर्यटक चिखलदऱ्यात (Tourist Enter In Chikhaldara ) दाखल होत आहेत. चिखलदरामध्ये उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंटसवारी, सायकल सवारी, त्याचप्रमाणे जंगल सफारी यामुळे पर्यटकांची पसंती देवी पॉइंटला दिसून येत आहे.
असे आहे मेळघाटातील विलोभनिय दृष्य -
सध्या राज्यभरात काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच चिखलदरा हे थंड वातावरण असलेल पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे चिखलदरात थंडीने उच्चांक गाठला आहे. थंडीमुळे चिखलदराचे सौंदर्य आणखी फुलले आहे. दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ते, वातावरणात गारवा, हाड गोठवणारी थंडी आणि समोर पेटलेली शेकोटी, अशी काहीशी विलोभनीय दृश्य सध्या मेळघाटात बघायला मिळत आहे.