महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 70 वर, मालवीय चौक ते चित्रा चौक प्रतिबंधित क्षेत्र घोषित - amravati corona latest news

मंगळवारी आणखी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 70 झाली आहे.

amravati corona
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 70 वर, मालवीय चौक ते चित्रा चौक प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By

Published : May 6, 2020, 11:13 AM IST

अमरावती- कोरोनाग्रस्तांचा आकडा मंगळवारी 70 वर पोहोचला आहे. सोमवारी मध्यरात्री माजी राज्यमंत्र्यांसह चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मंगळवारी आणखी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 70 झाली आहे.

अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 70 वर

मंगळवारी दुपारी प्राप्त अहवालात शिराळा येथील रहिवासी असणाऱ्या 27 वर्षीय युवकाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. रात्री नव्याने आणखी 24 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी चार जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ताजनगर येथील 44 वर्षीय पुरुष, हबिबनगर परिसरातील 26 वर्षीय पुरुष आणि वरुड येथील 23 आणि 24 वर्षीय महिला या कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. अमरावतीत माजी वन राज्यमंत्र्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट होताच अमरावतीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी मालवीय चौक ते चित्रा चौक हा भाग महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details