अमरावती - रविवारी प्राप्त तपासणी अहवालानुसार कोरोनाच्या आणखी दोन रुग्णांची भर अमरावतीत पडली आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या 55 झाली आहे.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 55 वर... ३८८ अहवाल प्रतिक्षेत - corona latestnews
शहरात हैदरपुरा, खोलपुरी गेट, मसानगंज, कंवरनगर आणि बडनेरा जुनी वस्ती हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. 388 संभाव्य कोरोना रुग्णांचे अहवालांची प्रतीक्षा असून यापैकी अनेक अहवाल हे सोमवारी प्राप्त होण्याचा अंदाज आहे.
प्राप्त अहवालात खोलपुरी गेट परिसरात 62 वर्ष वयाच्या महिलेला कोरोना असल्याचे समोर आले असून ताज नगर परिसरात 25 वर्षीय महिला कोरोनाबधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिलला आढळून आल्यावर रविवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 55 वर पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे अमरावतीत कोरोना नेमका कुठून पसरला याची माहिती मिळवण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. शहरात हैदरपुरा, खोलपुरी गेट, मसानगंज, कंवरनगर आणि बडनेरा जुनी वस्ती हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. 388 संभाव्य कोरोना रुग्णांचे अहवालांची प्रतीक्षा असून यापैकी अनेक अहवाल हे सोमवारी प्राप्त होण्याचा अंदाज आहे.