अमरावती - कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी 111 वर गेली आहे. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 34 रुग्णांवर कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 11 हजार 481 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
अमरावतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 111 वर; 11 हजार 481 जणांची तपासणी
सोमवारी प्राप्त अहवालात 12 वर्षाच्या मुलीसह 23, 30 आणि 32 वर्ष वयाच्या युवकांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे चारही जण अमरावतीच्या लालखडी परिसरातील आहेत. लालखडी परिसरात यापूर्वी मिळालेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात हे चौघेही होते.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालासोबतच कोरोना चाचणीचा तपशील देण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत 11 हजार 481 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 हजार 699 जणांचे थ्रोट स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 336 जणांचे अहवाल निगेटिव्ह आणि 111 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असून 34 जणांवर अमरावतीत आणि दोघांवर नागपूरला उपचार सुरू आहेत. 62 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून 78 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. सोमवारी 138 नवीन नमुने पाठविण्यात आले आहेत.