अमरावती -भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सध्या संपूर्ण देशभर हर घर तिरंगा Har Ghar Tiranga अभियान राबविले जात आहे. असे असताना अमरावती शहरात मात्र 32 वर्षांपासून स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिनाच्या पर्वावर शहरातील शिक्षक राष्ट्रीय चिन्हांची Tiranga distribution Amravati भेट जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांना देत आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांनी घरावर लावण्यासाठी शेकडो झेंड्यांचे वितरण केले आहे. तर शहरातील प्रत्येक ऑटो रिक्षांवर देखील झेंडा फडकावा यासाठी ते ऑटो रिक्षा चालकांनाही तिरंगा झेंड्याचे वितरण करत आहेत.
संतोषकुमार अरोरा यांचा अभिनव उपक्रम :खेळाडू असणारे संतोष कुमार अरोरा यांना देशाप्रती अत्यंत आदर आहे. 1993 मध्ये त्यांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या पर्वावर शाळेतील विद्यार्थ्यांना छोट्या आकारातील कागदाचे राष्ट्रध्वज भेट स्वरूपात द्यावे, अशी कल्पना सुचली. 26 जानेवारी 1993 ला त्यांनी 20 रुपयाला कागदाचे एकूण 200 लहान आकारातील राष्ट्रध्वज खरेदी केले. ते शिक्षक असणाऱ्या शहरातील संत कवर राम विद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांनी लहान आकारातील कागदांच्या राष्ट्रध्वजाचे वितरण केले. 26 जानेवारी 1993 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला आज तीस वर्षे झाली.