महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Corona Vaccine : लसी सुरक्षीत! प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसींवर भारनियमनाचा कोणाताही परिणाम नाही - अमरावती कोरोना लस लोडशेडींग परिणम

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तास दोन तास लोडशेडिंगमुळे ( Amravati Loadsheding ) वीज पुरवठा खंडीत होतो आहे. अशा परिस्थितीत लहान बालकांसाठी असणाऱ्या विविध लसी कोल्ड स्टोरेज मध्ये ( Cold Storage For Vaccine) ठेवण्यात येतात. तसेच औषधी दुकानांमध्ये सुद्धा इनवर्टरची व्यवस्था असल्यामुळे फ्रिजमध्ये ठेवण्यात येणारी इंजेक्शन सध्यातरी सुरक्षित असल्याचे 'ईटीव्ही भारत'ने घेतलेल्या आढाव्यात दरम्यान दिसून आले.

Amravati Corona Vaccine
Amravati Corona Vaccine

By

Published : May 20, 2022, 4:39 PM IST

अमरावती -अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तास दोन तास लोडशेडिंगमुळे ( Amravati Loadsheding ) वीज पुरवठा खंडीत होतो आहे. अशा परिस्थितीत लहान बालकांसाठी असणाऱ्या विविध लसी कोल्ड स्टोरेज मध्ये ( Cold Storage For Vaccine) ठेवण्यात येतात. मात्र, सध्या लोडशेडिंगचा मोठा फटका जाणवत नसल्यामुळे तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यावर जनरेटरची व्यवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या सर्व प्रकारच्या लसी या सुरक्षित आहेत. औषधी दुकानांमध्ये सुद्धा इनवर्टरची व्यवस्था असल्यामुळे फ्रिजमध्ये ठेवण्यात येणारी इंजेक्शन सध्यातरी सुरक्षित असल्याचे 'ईटीव्ही भारत'ने घेतलेल्या आढाव्यात दरम्यान दिसून आले.

प्रतिक्रिया

मार्डी आरोग्य केंद्रात अशी आहे व्यवस्था -तिवसा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मार्डीयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना लस देण्यात येते. तसेच या आरोग्य केंद्रावरून कोविड लस सुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्रावरून मार्डी गावातील ग्रामस्थांना देण्यात आल्यात. विशेष म्हणजे कोविडचे एकूण 100% लसीकरण मार्डी आरोग्य केंद्राने पूर्ण केले आहे. या केंद्रावर कोविडची लस ठेवण्यासाठी अत्यावश्यक असणारे कोल्डस्टोरेजची व्यवस्था करण्यात आली असून या लसी ठेवण्यासाठी डिप फ्रिजरची सोय मार्डी येथील आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. अत्यंत गरजेच्या ठिकाणी लस न्यायचे असल्यास आइस पॅकची व्यवस्था मार्डी येथील आरोग्य केंद्रावर करण्यात आली आहे. या आइस पॅकमध्ये बारा ते चौदा तासांपर्यंत लस्सी सुरक्षित राहतात, अशी माहिती येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. सध्या लोडशेडिंगचा कुठलाही त्रास नाही. दिवसभरातून तास दीड तास वीज खंडित होते. यामुळे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आलेल्या लसींवर कोणाताही परिणाम होत नाही. आमच्याकडे इन्व्हर्टरची सुविधा असून जनरेटर सुद्धा आरोग्य केंद्रावर आहे. यामुळे आरोग्य केंद्रावरील लस्सी खराब होऊ शकतात, अशी कुठलीही अडचण या ठिकाणी नाही, असे व्ही. एस. चारथळ यांनी स्पष्ट केले.

औषधी दुकानदारांनाही अडचण नाही -अमरावती शहरात सध्या तरी लोडशेडिंगचा कुठलाही त्रास जाणवत नाही. आमच्याकडे असणारे इंजेक्शन फ्रिजमध्ये सुरक्षित ठेवण्यात येतात. जर एखाद वेळी वीज पुरवठा खंडीत झाला, तर इन्व्हर्टरची सुविधा असल्यामुळे फ्रिज बंद पडत नाही. अमरावती शहरात आमच्याप्रमाणेच सर्वच औषधी दुकानांमध्ये अशी व्यवस्था असल्याची माहिती औषधी विक्रेते मिथीलेश बिजवे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा -Ketki Chitale Police Custody : केतकीला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी; रबाळे पोलीस करणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details