अमरावती -आमदार सुलभा खोडके यांच्या शेतात गौण खनिजांची चोरी होत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. सुलभा खोडके यांचे छत्री तलाव मागील कंवरधाम परिसरासमोर शेत आहे. या शेतामध्ये गौण खनिज चोरी होत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी गौण खणीच चोरी करणाऱ्यांना मुद्देमलासह ताब्यात घेऊन मोठी कारवाई करण्यात आली. महसूल आणि पोलीस प्रशासने ही संयुक्त कारवाई केली आहे.
तीन ट्रक आणि दोन ट्रॅक्टर जप्त-
याप्रकरणी आमदार सुलभा खोडके यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके तोंडी तक्रार दिली होती. त्यानुसार तहसीलदार संतोष काकडे, बडनेराचे ठाणेदार पंजाब वंजारी यांच्या नेतृतवात तलाठी तसेच पोलीस खोडके यांच्या शेतात धडकले. यावेळी शेतात तीन ट्रक आणि दोन ट्रॅक्टरमध्ये गौण खनिज भरलेले आढळून आले. तर तीन ते चार ट्रक पळून गेलेत. पोलिसांनी तीन ट्रक आणि दोन ट्रॅक्टर जप्त करून बडनेरा पोलीस ठाण्यात जमा केले. आज (शनिवारी) सकाळी ही कारवाई करण्यात आली.