अमरावती -शहरातील सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात मागिल सात महिन्यापासून 24 तास सेवा देणाऱ्या निवासी कोविड योद्ध्यांसाठीच्या जेवणाची मेस प्रशासनाने 5 दिवसापासून बंद केली आहे. त्यामुळे कोविड योद्धा असलेले कर्मचारी उपाशी आहेत. अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तबल 224 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, आता हळूहळू कोरोना रूग्ण कमी होत असल्याने त्यात जास्त खर्च झाल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाने येथील कर्मचाऱ्यांना मिळणारे जेवण बंद केले आहे.
याठिकाणी सुरू असलेली मेसही बंद करण्यात आली असल्याने या कर्मचाऱ्यांना उपाशी पोटी काम करण्याची वेळ आली आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह वार्डात हे कंत्राटी कर्मचारी काम करत असल्याने त्यांना इतर ठिकाणाहून कोणीही जेवण देत नाही. त्यामुळे रुग्णांची सेवा कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत असून प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील मेस बंद; कोविड योद्धेच उपाशी - अमरावती सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालय
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी असलेली जवणाची मेस प्रशासनाने बंद केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे.
कोविड योद्धे
Last Updated : Nov 2, 2020, 3:25 PM IST