महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gas Cylender Blast : सिलिंडरच्या स्फोटाने हादरला जवाहर गेट परिसर, अमरावतीत शनिवारी पहाटे अग्नितांडव

अमरावती - जवाहर गेट ते सराफा बाजार रोडवरील जय मेटल व गणेश श्रुंगार या व्यापारी प्रतिष्ठानाला शनिवारी पहाटे भीषण आग ( Fierce fire In Amravati ) लागल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. आगीदरम्यान वरच्या माळ्यावरील घरातील चार गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट ( Gas Cylender Blast ) झाल्यामुळे जवाहर गेट परिसर हादरून गेला होता. अमरावतीमध्ये ( Amravati ) झालेल्या या घटनेत सुदैवाने या व्यापारी प्रतिष्ठानाच्या तिसऱ्या माळ्यावर राहणारे रोशन कात्रेला यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले, परंतु या आगीत दोन्ही दुकानातील साहित्यांसह घरघुती साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

Gas Cylender Blast
Gas Cylender Blast

By

Published : Jun 18, 2022, 10:40 PM IST

अमरावती -जवाहर गेट ते सराफा बाजार रोडवरील जय मेटल व गणेश श्रुंगार या व्यापारी प्रतिष्ठानाला शनिवारी पहाटे भीषण आग ( Fierce fire In Amravati ) लागल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. आगीदरम्यान वरच्या माळ्यावरील घरातील चार गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट ( Gas Cylender Blast ) झाल्यामुळे जवाहर गेट परिसर हादरून गेला होता. अमरावतीमध्ये ( Amravati ) झालेल्या या घटनेत सुदैवाने या व्यापारी प्रतिष्ठानाच्या तिसऱ्या माळ्यावर राहणारे रोशन कात्रेला यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले, परंतु या आगीत दोन्ही दुकानातील साहित्यांसह घरघुती साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाचे पाच तास प्रयत्न -चार सिलिंडरचे एकापाठोपाठ एक असे प्रचंड आवाज करीत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. अग्निशमनच्या चमुने पाच ते सहा तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा अरुंद रस्त्यावरील परिसरात असणारी ही बाजारपेठ आगीच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता होती.

थोडक्यात बचावले कात्रेला कुटुंब -जवाहर रोडवर कृष्णार्पण कॉलनीतील रहिवासी जयकुमार कात्रेला यांचे जय मेटल मार्टचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावरच त्यांचे नातेवाईक उगम कात्रेला यांचे गणेश श्रुंगार नामक व्यापारी प्रतिष्ठान आहे. जय मेटल मार्ट या प्रतिष्ठानावर गणेश श्रुंगारचे दुकान असून, तिसऱ्या माळ्यावर उगम कात्रेला व रोशन कात्रेला यांचे कुटुंबीय राहतात. शुक्रवारी रात्री दोन्ही व्यापारी प्रतिष्ठाने बंद केल्यानंतर उगम कात्रेला, रोशन कात्रेला व त्यांच्या कुटुंबातील दोन महिला, 25 वर्षीय मुलगा ईशान व मुलगी मनिषा असे सर्वजण तिसऱ्या माळ्यावरील घरात झोपले होते. दरम्यान जय मेटल दुकानाला अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. तळ मजल्यावरील दुकानातील आग पहिल्या माळ्यावरील दुकानापर्यंत पोहोचली होती. ही आग ही तिसऱ्या माळ्यावर पोहोचण्यापूर्वीच कात्रेला कुटुंबीय खळबळून जागे झाले आणि त्यांनी शेजारी असणारे चांडक यांच्या घरावरील स्लॅबवर उड्या घेऊन जीव वाचविला. कात्रेला कुटुंबीयांना जर थोडा वेळ झाला असता तर ते सुध्दा आगीच्या विळख्यात सापडले असते.

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत शनिवारी २०५४ नवे रुग्ण, २ रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details