अमरावती -आज आमदार रवी राणा यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी राजापेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच, परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपूल पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासून बंद केला आहे. (MLA Ravi Rana) या उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारीला (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Amravati) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी बसवला होता. हा पुतळा महापालिका प्रशासनाने काढून टाकल्यामुळे महापालिका आयुक्त आणि राणा समर्थकांमध्ये हा वाद सुरू आहे. राणा समर्थक कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर शाही फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
आमदार रान विरोधात गुन्हा दाखल
अमरावती महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांना राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी बोलावे ते राणा समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. या प्रकाराबाबत महापालिका आयुक्तांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 11 जणांपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आमदार रवी राणा हे दिल्लीवरून अमरावती येणार असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करण्याची तयारी केली आहे.
शिवजयंतीनिमित्त खबरदारी