महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 8, 2020, 4:02 AM IST

ETV Bharat / city

#WomensDay शुन्यातून 'स्वयंसिद्धा'; अमरावतीकर महिलांची विकासाकडे वाटचाल

सुरु होण्यापूर्वीच शुन्यात जमा होणाऱ्या व्यवसायांना, उद्योगांना चालना मिळावी, या उद्देशाने दोन वर्षापासून स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानची मोठी मदत होत आहे. यामुळे अमरावती शहरातील अनेक महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय उरावर आणण्यासह स्वतः यशस्वी उद्योजिका, व्यवसायिक म्हणून अनेकींना सन्मान मिळतो आहे.

अमरावतीकर महिलांची विकासाकडे वाटचाल
अमरावतीकर महिलांची विकासाकडे वाटचाल

अमरावती - आपल्या कुटुंबाच्या विकासात आपलाही हात भार लगाव या उद्देशाने अनेक महिला आपला एखादा छोटासा व्यवसाय, उद्योग सुरु करतात. मात्र, हा व्यवसाय नेमका करायचा कसा? तो टिकवायचा कसा याबाबतचे ज्ञान अनेकांना नसते. अशाच सुरु होण्यापूर्वीच शुन्यात जमा होणाऱ्या व्यवसायांना, उद्योगांना चालना मिळावी, या उद्देशाने दोन वर्षापासून स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानची मोठी मदत होत आहे. यामुळे अमरावती शहरातील अनेक महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय उरावर आणण्यासह स्वतः यशस्वी उद्योजिका, व्यवसायिक म्हणून अनेकींना सन्मान मिळतो आहे.

अमरावतीकर महिलांची विकासाकडे वाटचाल
दोन वर्षांपुर्वी म्हणजेच 8 मार्च 2018ला 'स्वयंसिद्धा' या संघटनेची स्थापना करण्यात आली. समाजातील युवती महिला या उद्योजिका व्हाव्या या उद्देशाने स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे, या स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, व्यवसायाला चालना मिळवून देणे हा उद्देश स्वयंसिद्धा ने समोर ठेवला आणि राबविला. स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानाच्या धडपडीला मोठे यश आले आणि आज खचलेल्या अनेक अशा महिलांना आपण आता आपल्या व्यवसायात कधीही मागे येऊ शकणार नाही असा विश्वास निर्माण झाला आहे.

हेही वाचा -महिला दिन विशेष: मराठी भाषेच्या उन्नतीसाठी बंगाली महिलेचा पुढाकार; काय केलं ते वाचा सविस्तर....

अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या संकल्पनेतून स्वयंसिद्धाची स्थापना करण्यात आली. मोनिका उमाक आणि काही धाडसी महिलांनी समोर येऊन समाजातील स्त्रियांमध्ये आपलाही स्वतःचा व्यवसाय असू शकतो याबाबत विश्वास निर्माण केला. यामुळेच आज काही महिला स्वतःची खानावळ चालवून स्वयंसिद्धा झाल्या आहेत तर अनेकांचे शहरात चांगले बुटीक आहे. काहींच्या पापड, लोणचे, शेवाया कानाकोपर्‍यात पोहोचल्या आहेत. एकूणच पहिल्या व्यवसायासाठी धडपडणार्‍या अनेक महिला या आज 'स्वयंसिद्धा' झाल्या आहेत. याचे श्रेय खऱ्या अर्थाने स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानाला आहे.

हेही वाचा -धसका 'कोरोना' विषाणूचा; शरद पवारांचा जळगाव दौरा स्थगित

ABOUT THE AUTHOR

...view details