महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुट्टे पैसे परत करा म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला एसटी बस वाहकाकडून मारहाण - ST bus conductor In Amravati

Amravati Crime शैक्षणिक कामानिमित्त बसमधून प्रवास करणाऱ्या गरीब विद्यर्थ्याने तिकिटासाठी दिलेल्या 500 रुपयांची नोट घेऊन सुटे पैसे देण्यास महिला वाहकाने टाळाटाळ केली. आपले पैसे परत मिळावे, म्हणून आपले गाव आले तरीही दर्यापूर बस स्थानकापर्यंत प्रवास करून आपले पैसे परत करा, अशी विनंती करणाऱ्या विद्यार्थ्यास महिला वाहक आणि आगारात असलेल्या अन्य एका पुरुष वाहकाने विद्यार्थ्यास मारहाण केली आहे.

Amravati Crime
Amravati Crime

By

Published : Sep 20, 2022, 3:22 PM IST

अमरावतीशैक्षणिक कामानिमित्त बसमधून प्रवास करणाऱ्या गरीब विद्यर्थ्याने तिकिटासाठी दिलेल्या 500 रुपयांची नोट घेऊन सुटे पैसे देण्यास महिला वाहकाने टाळाटाळ केली. आपले पैसे परत मिळावे, म्हणून आपले गाव आले तरीही ( Amravati Crime ) दर्यापूर बस स्थानकापर्यंत प्रवास करून आपले पैसे परत करा, अशी विनंती करणाऱ्या विद्यार्थ्यास महिला वाहक आणि आगारात असलेल्या अन्य एका पुरुष वाहकाने विद्यार्थ्यास मारहाण केली आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

असा आहे संपूर्ण प्रकारदर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई या गावातील वीरेंद्र पवार हा विद्यार्थी शैक्षणिक कामानिमित्त येवदा येथे जाण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी दर्यापूरच्या एसटी बसमध्ये बसला. त्याच्याकडे असणारे 500 रुपयांची नोट महिला वाहकाला दिली. तिने 15 रुपयांचे तिकीट दिले आणि सुटेनंतर देईल सागितले. विद्यार्थीचे गाव आल्यावर महिला वाचकास उर्वरित रक्कम मागितली. ( Amravati Police ) तिने तिकीट आपल्याकडे घेऊन पैसे देण्यास नकार दिला. ( Amravati Crime ) दरम्यान आपले पैसे मिळावे, म्हणून विद्यार्थी पुन्हा गाडीत चढला आणि दर्यापूर बस स्थानकावर गाडी थांबली. त्यावेळेस येथील कार्यालयात महिला वाहकाच्या मागे जाऊन आपले पैसे त्याने मागितले. ( Amravati Crime ) यावेळी त्या महिला वाहकांनी चक्क त्या मुलाला मारहाण केली. यावेळी आणखी एक पुरुष चालत तेथे आला आणि त्याने मुलाला अमानुषपणे मारहाण सुरू केली. आपली चूक नसताना आपल्याला मारहाण होते आहे. आपले पैसे परत मिळावे, इतकीच त्या विद्यार्थ्यांची विनंती होती.

एसटी बस वाचकाकडून विद्यार्थ्यास मारहाण

दर्यापूर पोलिस ठाण्यात तक्रारदरम्यान एसटी बस वाहकाकडून विद्यार्थ्यास होणाऱ्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( video went viral on social media ) झाला आहे. या प्रकारात विद्यार्थ्याने दर्यापूर पोलीस ठाण्यात ( Daryapur Police Station ) तक्रार नोंदवली, असून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details