अमरावती -बडनेरा लगतच्या मधुबन वृद्धाश्रमात दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रम दरम्यान आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्यात वाद झाला. यानंतर राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली, या घटनेमुळे अमरावती शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला.
आमदार रवी राणा समर्थक अन् शिवसैनिकांमध्ये जोरदार हाणामारी
आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्यात वाद झाल्यानंतर राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली, या घटनेमुळे अमरावती शहरात तणाव निर्माण झाला.
हेही वाचा... आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान
मधुबन वृद्धाश्रम येथे दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार रवी राणा आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुक आपल्या कार्यकर्त्यांसह मधुबन वृद्धाश्रमात कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी दिनेश बुब यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत अपशब्द काढल्याचे, रवी राणा यांनी म्हटले. यानंतर संतप्त झालेल्या रवी राणा यांनी दिनेश बूब यांना मारहाण करताच शिवसैनिक आणि रवी राणा समर्थक एकमेकांवर तुटून पडले. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस मधुबन वृद्धाश्रम येथे पोचले. या प्रकरणात अद्याप कोणीही पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र घटनेनंतर अमरावती शहरात तणाव निर्माण झाला असून रवी राणा आणि दिनेश बुक या दोघांच्याही घरासमोर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत.
TAGGED:
Striking at badnera amravati