अमरावती : अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. यात चार दिवसांपूर्वी रात्री फिरणाऱ्या दोन युवकांना राजकमल चौकात कार्यरत असलेल्या एसआरपीएफ जवानांनी त्यांना हटकले होते. याच रागातून या दोन युवकांनी उड्डाणपूल गाठून एक 15 किलोच्या सिमेंट दगड उचलून चौकात खाली उभ्या असलेल्या पोलिसांच्या दिशेने टाकला होता. यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या दोन आरोपींविरुद्ध अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी घटनेपासून तब्बल दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून दोन आरोपींना अटक केली आहे .तुषार हरणे आणि प्रतीक धुमाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमरावती : उड्डाणपूलावरून पोलिसांवर फेकला दगड; आरोपीला केली अटक - etv bharat maharshtra
चार दिवसांपूर्वी रात्री तुषार व त्याचा मित्र हे दोघे राजकमल चौकातून साडेदहा वाजता सुमारास संचारबंदीच्या वेळेस फिरत होते. त्यामुळे जवानांनी हटकले असता, त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी समोर जाऊन दुचाकी उड्डाणपुलावर वळवली. आणि त्याच वेळी प्रतीकने रस्ता दुभाजकासाठी वापरलेला पंधरा किलोचा दगड उड्डाण पुलावरून खाली जवानांच्या दिशेने टाकला

चार दिवसांपूर्वी रात्री तुषार व त्याचा मित्र हे दोघे राजकमल चौकातून साडेदहा वाजता सुमारास संचारबंदीच्या वेळेस फिरत होते. त्यामुळे जवानांनी हटकले असता, त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी समोर जाऊन दुचाकी उड्डाणपुलावर वळवली. आणि त्याच वेळी प्रतीकने रस्ता दुभाजकासाठी वापरलेला पंधरा किलोचा दगड उड्डाण पुलावरून खाली जवानांच्या दिशेने टाकला. या वेळेस एका बँकेच्या सुरक्षारक्षकाला हा प्रकार लक्षात येताच, त्यांनी पोलिसांना सावध केल्याने अनर्थ टळला. यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. या आरोपीविरुध्द कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल केला. यावेळेस कोतवाली व राजापेठ पोलिस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान मागील चार दिवसांपासून पोलिसांनी दीडशे सीसीटीव्ही कॅमेराचे फूटेज तपासल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -CBI Joint Director : महाराष्ट्रकन्या विद्या कुलकर्णींची सीबीआयच्या सहसंचालकपदी निवड