मुंबई - हनुमान चालीसा पठणावरून मुंबईसह अमरावतीतही राजकारण तापले होते. यावेळी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर ( Ravi Rana house Amravati news ) शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला. तसेच यावेळी राणा यांच्या घरावर शिवसैनिकांकडून ( Ravi Rana Amravati Shankar Nagar house Stone pelting ) दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यासोबत रवी राणा यांच्या राजापेठ येथील ऑफिसवर हल्ला करण्यासाठीही शिवसैनिक गेले होते. मात्र, तेथे पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी ताबडतोब या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
दगडफेकीवर राणांची प्रतिक्रिया -आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना आपल्या अमरावती येथील घरावर दगडफेक ( Stone pelting at Ravi Rana house Amravati ) झाल्याची माहिती मिळताच त्यांनी सोशल मीडियांच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली. ही दगडफेक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशांनी झाली असल्याचा आरोप आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana Alligation On CM uddhav Thackeray ) यांनी केला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर ( Stone pelting at MLA Ravi Rana house ) मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. तसेच राणा यांच्या घरावर दगडफेकही केली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला. यावेळी राणा समर्थक आणि शिवसैनिकांनी राणा समर्थक आणि विरोधकांना शिवीगाळ केली.पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार रवी राणा यांच्या घरासमोर सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. आता शिवसैनिकांचा मोर्चा आमदार रवी राणा यांच्या घरासमोर धडकला असल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक राणा यांच्या घरासमोर दाखल झाली आहे. राणा यांच्या घरासमोर बॅरिकेट लावण्याचे कामही सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?- मला मुंबईत येऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांनी मला मुंबईत कधी यायचे, याची तारीख सांगावी. मी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावणार आहे, मी स्वतः मुंबईची मुलगी असून आज विदर्भाची सून आहे. आज त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असेल, तर माझ्याकडे विदर्भाची संपूर्ण ताकद असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाहीतर आम्ही हनुमान जयंती नंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यानुसार आज राणा दाम्पत्य मातोश्री समोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार होते. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे राणा यांना ते शक्य झाले नाही.
हेही वाचा -Yuva Swabhiman Party : युवस्वाभिमानच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे