अमरावती - दोन समाजातील वादामुळे मागील 15 वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा गुंडाळून ठेवण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची अशी अवस्था पाहून त्यांचे नातू सचिन साठे दुःखी झाले. तसेच साठेंच्या पुतळ्यासाठी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
दोन समाजातील वादामुळे मागील १५ वर्षांपासून अण्णाभाऊ साठेंचा पुतळा गुंडाळलेलाच - girl high school,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गुंडाळून ठेवण्यात आला आहे. दोन समाजातील वादामुळे हा पुतळा गेल्या 15 वर्षापासून गुंडाळून ठेवण्यात आला आहे. या पुतळ्याची अवस्था पाहून त्यांचे नातू सचिन साठे यांनी दु:ख व्यक्त केले.
राजापेठ पोलीस स्टेशनच्या मागे महापालिकेच्या संकुलासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा आहे. त्यांचा पुतळा जवळपास पंधरा वर्षांपासून गुंडाळून ठेवण्यात आला आहे. शहरातील गर्ल्स हायस्कुल चौकात हा पुतळा बसविण्यात यावा, अशी मातंग समाजाची मागणी आहे. आदिवासी समाजाने गर्ल्स हायस्कुल चौकत राणी दुर्गावती यांचा पुतळा बसविण्याची मागणी केल्याने दोन गटात वाद आहे. हा वाद सध्या न्यायालयापर्यंत पोहचला आहे.
जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघात मानवहीत लोकशाही पक्षाला प्रतिसाद मिळू शकतो काय याची चाचपणी करण्यासाठी सचिन साठे मंगळवारी अमरावतीत आले होते. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा झाकून का आहे, याची माहिती त्यांनी घेतली. याबाबत मला दुःख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयाचा निकाल आल्यावरच आणभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आंदोलन उभारण्यात येईल, असे सचिन साठे म्हणाले.