अमरावतीशेगावीचा राणा गजानन महाराज यांच्या गजाननभक्ताचे पाचवे राज्यस्तरीय संमेलन नोव्हेंबरमध्ये अमरावतीमध्ये होणार असल्याने जिल्ह्यातील गजानन भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ( State level Conference ) या संमेलनाला राज्यभरातून हजार भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती आनंद ( gajanan Maharaj in amravati ) अध्यात्मिक बहुउद्देशीय सेवा संस्थेचे सचिव जयंत नांदेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
कोण होते गजानन महाराज, कोठून आलेत ?श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलु नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या श्री गजानन महाराज चरित्र कोश या दासभार्गव नावाच्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकात या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. इ. स. २००३ मध्ये या लेखकाची मुलाखत १२९ वर्षे वयाच्या शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री झाली. त्यावेळी सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी श्री महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले होते.
हे सत्पुरुष मूळचे तमिळनाडूमधील तिरुनेलवेल्लीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले, त्यानंतरही ते २५- ३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येकवेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे यांच्या घरी राहत होते. कालांतराने हे सत्पुरुष तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळी कोणासही दिसले नाहीत. याच सत्पुरुषाचा उल्लेख खापर्डे यांनी श्री गजानन विजय या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे.