महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावती जिल्ह्यात रविवारी एसटी सेवा राहणार बंद - st service closed

अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत होत आहे.

अमरावती जिल्ह्यात रविवारी एसटी सेवा राहणार बंद
अमरावती जिल्ह्यात रविवारी एसटी सेवा राहणार बंद

By

Published : Feb 19, 2021, 4:14 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता शनिवार रात्री आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा काल अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी केली. त्याच पार्श्वभूमीवर आता अमरावती जिल्ह्यातील बससेवा ही या काळात बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय एसटी महामंडळने घेतला. त्यामुळे शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यातील सर्व एसटी सेवा बंद राहणार आहेत. दरम्यान इतर जिल्ह्यातून अमरावतीमध्ये येणाऱ्या बस चालू राहतील की बंद याबाबत अद्यापही निर्णय व्हायचा आहे.

अमरावती जिल्ह्यात रविवारी एसटी सेवा राहणार बंद
एक दिवसाच्या लॉकडाऊन संदर्भात एसटी बंद ठेवण्याबाबतची माहिती जिल्ह्यातील सर्व आगर प्रमुखांना देण्यात आली आहे. अमरावतीत नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद सह इतर जिल्ह्यातून बससेवा सुरू राहतात. मात्र इतर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद राहतील याबाबत काही आदेश नाही, मात्र अमरावती जिल्हा सेवा बंद राहणार असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
प्रवाशांनी मास्क लावून प्रवास करावा-

कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने तोंडाला मास्क लावूनच एसटी बसने प्रवास करावा, असे आवाहन वेळोवेळी एसटी महामंडळाच्या वतीने अमरावती आगारातील प्रवाशांना केले जात आहे. सोबतच रविवारी एसटी पूर्णता बंद राहील, असे प्रवाशांना सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-शिवजयंतीनिमित्तच्या ट्विटमुळे सेहवाग चर्चेत, म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details