महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

SSC Result Declared : अमरावती विभागाचा 96. 81 टक्के निकाल; गुणपडताळणी 20 ते 29 जून दरम्यान करता येणार अर्ज

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. अमरावती विभागाचा निकाल 96. 81 टक्के इतका लागला आहे. अमरावती विभागात एकूण 1 लाख 50 हजार 549 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यापैकी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अमरावती विभागात 70 हजार 383 इतकी आहे.

SSC Result Declared
SSC Result Declared

By

Published : Jun 17, 2022, 3:37 PM IST

अमरावती -माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. अमरावती विभागाचा निकाल 96. 81 टक्के इतका लागला आहे. अमरावती विभागात एकूण 1 लाख 50 हजार 549 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यापैकी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अमरावती विभागात 70 हजार 383 इतकी आहे.

प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांना करता येणार गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन -ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकन यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. गुण पडताळणीसाठी 20 जून ते 29 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात आले आहेत. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागण्यासाठी 20 जून ते नऊ जुलै पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून यासाठी चारशे रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ज्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करावयाचे आहे. त्यांना एका उत्तर पत्रिकेसाठी तीनशे रुपये ऑनलाईन पद्धतीने भरून अर्ज करता येणार आहे.

विभागात वाशिम जिल्ह्याने मारली बाजी -अमरावती विभागात सर्वाधिक 96. 81 टक्के निकाल लागलेल्या वाशिम जिल्ह्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात बाजी मारली आहे. वाशीम जिल्ह्यात येणाऱ्या वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या सहाही तालुक्यातील निकाल हा 95 टक्क्यांच्यावर आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 96.30 टक्के इतका लागला आहे. अकोला जिल्ह्याचा निकाल 74.06 टक्के अमरावती जिल्ह्याचा निकाल 70.77 टक्के आणि बुलढाणा जिल्ह्याचा निकाल 65.31 टक्के इतका लागला आहे.

विद्यार्थ्यांना करता येणार पुनर्मूल्यांकन -ऑनलाईन निकालानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी अर्ज 20 जून ते 29 जून दरम्यान 50 रुपये शुल्क भरून ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ज्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती हवे आहेत. त्यांना त्या 20 जून ते नऊ जुलै दरम्यान ऑनलाइन अर्ज करून तसेच प्रति विषयासाठी 400 रुपये शुल्क भरून मागता येणार आहे. यासोबतच उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रति विषयाला 300 रुपये शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अमरावती विभागीय सचिव उल्हास नरड यांनी दिली.

हेही वाचा -SSC Result Declared : दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी, तर 'या' विभागाचा निकाल सर्वाधिक

ABOUT THE AUTHOR

...view details