अमरावतीअतिशय सुंदर आणि मोहक असणाऱ्या, उजवी सोंड आणि एकदंत असणाऱ्या, सिद्धिविनायकाचे मंदिर Siddhivinayak अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यात येणाऱ्या, श्रीक्षेत्र वायगाव shreekshetra waigaon येथे आहे. सिद्धिविनायकाच्या उजव्या बाजूला सिद्धी आणि डाव्या बाजूला रिद्धी आहे. या गणरायाच्या हातातील माळ आणि मोदक जीवनातील सिद्धीचा संकेत देतात. विशेष म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होतांना सूर्योदयाची पहिली किरणे या मूर्तीवर पडतात. नवसाला पावणारा गणपती Siddhivinayak taking vows at Vaigaon अशी सिद्धिविनायकाची ख्याती आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर केवळ अमरावती जिल्ह्यातच सिद्धिविनायकाचे दर्शन भाविकांना होत असते. महाराष्ट्रभरातील शेकडो भाविक दरवर्षी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी वायगावला येतात. बघुया या सिद्धिविनायकाचा काय आहे History and Culture of Lord Ganesh 2022 इतिहास.
प्रतिक्रिया व्यक्त करतांना पुजारी
सिद्धिविनायकाची अशी आहे आख्यायिकापांडव अज्ञातवासात असतांना, चिखलदरा येथील विराट राजाकडे बराच काळ राहायला होते. विराट राजाकडून परततांना अचलपूर शहरापासून काही अंतर लांब मार्गात असणाऱ्या, या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यावरच पांडवांचा अज्ञातवास संपला होता, अशी आख्यायिका आहे.
सिद्धिविनायकाच्या मूर्तीचा असा आहे इतिहासशेकडो वर्षांपासून Amravati Siddhivinayak Hundreds years history वायगाव येथे सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. मुघल काळात मात्र वायगाव लगत असणारे अचलपूर, दारापूर, कोल्हापूर ही सर्व गावे मुघलांच्या ताब्यात होती. या काळात हिंदूंची मंदिरे आणि मूर्ती सुरक्षित नसल्यामुळे वायगाव येथील सिद्धिविनायकाची मूर्ती जमिनीत लपविण्यात आली होती. ही मूर्ती नेमकी कुठे लपविली आहे, याचा अचूक ठाव ठिकाणा लागत नव्हता. मात्र परिसरातील रहिवाशांना श्रींचा साक्षात्कार नेहमीच व्हायचा. गावातील इंगोले कुटुंबीयांनी वाड्यासाठी खोदकाम केले असताना. तब्बल सहाशे वर्ष जमिनीत असणारी ही मूर्ती सोळाव्या शतकात बाहेर आली. ज्या ठिकाणी मूर्ती सापडली तेथे वाडा रुपी मंदिर उभारून, त्या ठिकाणी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि इंगोले कुटुंबीय तेव्हापासून सिद्धिविनायकाच्या पूजा विधीची जबाबदारी सांभाळून आहेत. 2002 मध्ये वायगाव येथील सिद्धिविनायकाच्या वाड्याचे जीर्णोद्धार करून या ठिकाणी सुंदर असे मंदिर उभारण्यात आले.
गणेशोत्सवा दरम्यान उसळते गर्दीगणेशोत्सवा दरम्यान दहाही दिवस भाविकांची गर्दी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी उसळते. गणेशोत्सवा दरम्यान भाविकांना महाप्रसाद, ज्ञानदान, भजन कीर्तन, हरिपाठ मंदिरात होते. संकष्ट चतुर्थीला देखील अमरावती जिल्ह्यासहलगतच्या, अनेक जिल्ह्यातून देखील शेकडो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबई, पुण्यासह, मध्य प्रदेशातील अनेक शहरातून भाविक वायगावला येत असतात.
हेही वाचाGanesh Chaturthi 2022 यंदा तुळशीबाग गणपतीच्या सभामंडपामध्ये स्वानंदपूरम दृश्य, गणरायाची 10 किलो चांदीची मूर्ती