अमरावती स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या आणि राज्यातील द्वितीय क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या Shri Shivaji education society कार्यकारी परिषेच्या Election to the post of Executive Council, ९ पदाकरिता ११ सप्टेंबरला निवडणूक 21 candidates in stand for 9 seats होणार आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी 'श्री शिवाजी शिक्षण संस्थेची' स्थापना केली होती. संस्थेकडून सुमारे १०० अधिकारी व कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून; ८ सप्टेंबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. Shri Shivaji education society election
अशी पार पडेल निवडणूक प्रक्रियाश्री शिवाजी शिक्षण संस्थेचा कार्यकारी परिषदेचा कार्यकाळ, १४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी ११ सप्टेंबरला संस्थेची निवडणूक होणार आहे. याकरिता ८ व ९ सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत, संस्था कार्यालयात निवडणुकीकरिता, कोरे नामांकन अर्ज विक्रीकरिता उपलब्ध राहणार आहे. १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आमसभेला सुरुवात होईल. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करणे. दुपारी ३:३० वाजता प्राप्त नामांकन अर्जाची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करणे. दुपारी ३:३१ ते ४:३० दरम्यान प्राप्त नामांकन अर्जाची छाननी करणे. सायंकाळी ५ वाजता वैद्य नामांकन अर्जाची यादी प्रसिद्ध करणे. सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. तर सायंकाळी ६:३० वाजता निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबर रोजी, सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत 'श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालयात' पाच केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडेल. सायंकाळी 7:30 वाजता पासून मतभेद प्रारंभ होईल व निकाल जाहीर केला जाईल.