महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Office Attack : शिवसेना कार्यालय हल्ला प्रकरण; राणांच्या चार समर्थकांना अटक - शिवसेना कार्यालय हल्ला प्रकरण चार समर्थकांना अटक

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना जामीन मिळाल्यानंतर समर्थकांनी आतीषबाजी केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना कार्यालयावर हल्ला केला ( shivsena office attack case ) आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली ( yuva swabhimani party four worker arrested ) आहे.

Shivsena Office
Shivsena Office

By

Published : May 5, 2022, 9:26 PM IST

अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना बुधवारी राजद्रोहाच्या गुन्हात जामीन मिळाला आहे. त्यानंतर राणा समर्थकांनी रात्री राजापेठ चौक येथे फटाक्यांची आतीषबाजी केली. ती केल्यावर समर्थकांनी शिवसेना कार्यालयावर हल्ला केला ( shivsena office attack case ) होता. या प्रकरणात आता पोलिसांनी एकूण चार जणांना अटक केली ( yuva swabhimani party four worker arrested ) आहे.

पोलिसांनी केली त्वरित कारवाई - राणा समर्थकांनी शिवसेना कार्यालयात जात वस्तूंची तोडफोड केली. या घटना घडल्यानंतर राजापेठ पोलिसांनी तातडीने युवा स्वाभिमान पार्टीचे अभिजित देशमुख, अनुप अग्रवाल, स्वप्नील कोकाटे आणि अनिकेत देशमुख या चार जणांना अटक केली.

शिवसेनेने केला निषेध - बुधवारी ( 4 मे ) रात्री साडेदहाच्या सुमारास कार्यालयात कोणीही नव्हते. तेव्हा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयात जो काही प्रकार केला तो निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. पोलिसांनी राणा समर्थकांवर कारवाई न केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना धडा शिकवू, असा इशारा देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या जेलमधून बाहेर येणार आहेत. हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असून, अशा आनंदाच्या भरात कुठलाही चुकीचा प्रकार करु नये, असे आवाहन युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी समर्थकांना केले आहे.

हेही वाचा -Navneet Rana Crying : रुग्णालयात रवी राणा यांना पाहाताच नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू , पाहा भावूक क्षण

ABOUT THE AUTHOR

...view details