महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Agitation At Navneet Rana House: नवनीत राणांच्या घरासमोर शिवसेनेचे आंदोलन, शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात - नवनीत राणा घरासमोर शिवसेना आंदोलन

हनुमान चालीसा पठणाच्या ( Hanuman Chalisa ) मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana Hanumam Chalisa Statement ) यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानावर शिवसैनिकांनी मोर्चा ( Shivsainik Agitation At Navneet Rana Home ) काढला असताना यावेळी तणाव निर्माण झाला आहे.

Shivsena Agitation At Navneet Rana Home
Shivsena Agitation At Navneet Rana Home

By

Published : Apr 17, 2022, 3:36 PM IST

Updated : Apr 17, 2022, 4:37 PM IST

अमरावती -हनुमान चालीसा पठणाच्या ( Hanuman Chalisa ) मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana Hanumam Chalisa Statement ) यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानावर शिवसैनिकांनी मोर्चा ( Shivsainik Agitation At Ravi Rana Home ) काढला असताना यावेळी तणाव निर्माण झाला आहे. पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये काही प्रमाणात झटापट झाली असून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या नावाने रस्त्यावर बांगड्या ही फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

शिवसैनिकांनी केली जोरदार नारेबाजी -पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सैनिकांना अटक केल्यावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिला पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, यापुढे आमदार रवी राणा यांनी मातोश्री विरोधात वक्तव्य केले तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख पराग गुढदे यांनी दिला आहे. वाय प्लस सुरक्षा घेऊन वायफळ बोलणे टाळावे, असा टोलादेखील शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा यांना लगावला आहे.

रवी राणांच्या घरासमोर शिवसेनेचे आंदोनल

शिवसैनिक आक्रमक - हनुमान चालीसा पठन करण्याच्या मुद्द्यावरून अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठणासाठी आवाहन करणाऱ्या राणा दांपत्याविरोधात अमरावती शहर आणि जिल्हा शिवसैनिक आक्रमक झाले असून राणा यांच्या शंकर नगर येथील निवासस्थानी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्यामुळे अमरावती सध्या तणावाचे वातावरण आहे.

हेही वाचा -1 मे ला औरंगाबादमध्ये जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येत; राज ठाकरेंची घोषणा

नवनीत राणांविरोधात युवासेनेचेही आंदोलन -अमरावतीत हनुमान चालीसावरून राजकीय वातावरण तापलं असताना आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री'वर हनुमान चालीसा वाचू असा इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री अमरावतीत युवासेनेने राणा दाम्पत्याला जोरदार प्रत्युत्तर देत शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास रवी राणा यांच्या घरासमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार रवी राणा यांना प्रत्युत्तर देत 'मातोश्री'वर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली होती.

नवनीत राणांचेही शिवसेनेला प्रत्यूत्तर-युवासेनेच्या या आंदोलनानंतरखासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला प्रत्यूत्तर देत 'माझ्या घरासमोर रात्री चोरासारखे येऊन हनुमान चालीसा पठनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना खरोखरच हनुमान चालीसा पठण करायचे असते, तर मी माझ्या घरासमोर त्यांच्यासाठी सतरंजी टाकून हनुमान चालीसा पठणासाठी संपूर्ण व्यवस्था करून दिली असती', असे वक्तव्य केले होते.

राणा दाम्पत्यांनी नेमकं काय म्हटलं? -मला मुंबईत येऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांनी मला मुंबईत कधी यायचे, याची तारीख सांगावी. मी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावणार आहे, मी स्वतः मुंबईची मुलगी असून आज विदर्भाची सून आहे. आज त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असेल, तर माझ्याकडे विदर्भाची संपूर्ण ताकद असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाहीतर आम्ही हनुमान जयंती नंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता.

हेही वाचा -Praven Ashtikar Ink Thrown Case : अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणी रवी राणांची चौकशी सुरू

Last Updated : Apr 17, 2022, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details