महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sena Protest in Amravati : अमरावतीत शिवसेनेचे भाजपविरोधात जागृती आंदोलन; 'चाय पे चर्चा'करण्याची मागणी - अमरावतीत शिवसेनेचे भाजपविरोधात आंदोलन

महागाई विरोधात (inflation) आंदोलन करून देशात सत्तेवर आलेल्या भाजपने (BJP) आता प्रचंड वाढलेल्या महागाईवर चाय पे चर्चा करावी, यासाठी भाजपवाल्यांना जागृत करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अमरावती (Amravati Shiv Sena) शहरातील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले.

Amravati Shiv Sena agitation
अमरावतीत शिवसेनेचे भाजपविरोधात आंदोलन

By

Published : Apr 4, 2022, 3:02 PM IST

Updated : Apr 4, 2022, 5:00 PM IST

अमरावती - महागाई विरोधात (inflation) आंदोलन करून देशात सत्तेवर आलेल्या भाजपने (BJP) आता प्रचंड वाढलेल्या महागाईवर चाय पे चर्चा करावी, यासाठी भाजपवाल्यांना जागृत करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अमरावती (Amravati Shiv Sena) शहरातील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या चाय पे चर्चा या आंदोलनादरम्यान राजकमल चौक येथे चुलीवर चहा करण्यात आला. हा चहा चौकात येणाऱ्या प्रत्येक अमरावतीकरांना पाजण्यात आला.

अमरावतीत शिवसेनेचे आंदोलन

चाय पे चर्चा करण्याची मागणी -

केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी महागाईविरोधात ऊठसूट आंदोलन करणाऱ्या भाजपने त्यांची सत्ता असताना पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यासह सर्वच वस्तूंचे भाव वाढवले आहेत. भाजपने वाढवलेल्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. आपण नेमके काय करतो याबाबत चाय पे चर्चा करून भाजपला विचारमंथन करण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे नेते प्रदीप बाजड म्हणाले.

भाजप नेत्यांचे मुखवटे लावून केले निदर्शन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांचे मुखवटे चेहऱ्यावर लावून शिवसैनिकांनी भाजप आणि केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. जनतेच्या नेमक्या समस्या काय आहेत याचा विसर भाजपला पडला आहे. राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण उद्योग गुजरातमध्ये जात असतानाही महाराष्ट्रातील भाजपचे नेते गप्प का आहेत? असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी विचारला आहे.

Last Updated : Apr 4, 2022, 5:00 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details