अमरावतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मामींनी घेतली कोरोनाची लस - नितीन गडकरी यांच्या ममी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ८८ वर्षाच्या मामी शारदा रहाटगावकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. तसेच प्रत्येकाने स्वयंपूर्तीने येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन रहाटगावकर यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मामी
अमरावती-राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या लसीकरणाच्या मोहिमेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ८८ वर्षाच्या मामी शारदा रहाटगावकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. तसेच प्रत्येकाने स्वयंपूर्तीने येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन रहाटगावकर यांनी केले.