महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 10, 2022, 6:24 PM IST

ETV Bharat / city

Sharad Pawar In Amaravati : हिंदवी स्वराज्य सर्व जातींनी एकत्रित स्थापन केलेले राज्य - शरद पवार

स्वराज्य स्थापनेसाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य भोसले घराण्याचे नव्हते. तर, सर्व समाजातील लोकांचे हिंदवी स्वराज्य होते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली ( Sharad Pawar On Hindavi Swarajya ) आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

अमरावती -भारतात अनेक राजे आणि राजघराणे होऊन गेले. मात्र, राजघराण्याशी कुठलाही संबध नसताना, सर्व जातीच्या लोकांना एकत्र करुन स्वराज्य स्थापनेसाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य भोसले घराण्याचे नव्हते. तर, सर्व समाजातील लोकांचे हिंदवी स्वराज्य होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली ( Sharad Pawar On Hindavi Swarajya ) आहे.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण- शरद पवार अमरावती दौऱ्यावर ( Sharad Pawar In Amaravati ) आहेत. त्यांच्या हस्ते श्री शिवाजी संस्था संचलित डॉ. पंजाबराव देशमख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात ( Chhatrapati Shivaji Maharaj Statue Innauguration ) आले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार, शिक्षक आमदार किरण सरनाईक, खासदार नवनीत राणा, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजीमंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, माजी आमदार गोपीचंद बाजोरिया, आमदार अमोल मिटकरी आदी उपस्थित होते.

डॉ. पंजाबराव देशमुख दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व - यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख हे दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व होते. कृषीमंत्री म्हणून त्यांनी दिल्लीत आयोजित केलेले कृषी प्रदर्शन हे 90 दिवस चालले. अमेरिकेच्या अध्यक्षांसह रशियाच्या अध्यक्षांनी या कृषी प्रदर्शनला भेट दिली. ब्रिटनच्या राणीसह अनेक देशांच्या पंतप्रधानांनी या कृषी प्रदर्शनला भेट देऊन भरताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीची प्रशंसा केली. कृषी क्षेत्रसोबतच विदर्भात शिक्षण तळागाळातील प्रत्येकाला मिळावे यासाठी त्यांनी केलेले काम हे अतिशय मोलाचे आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेला मदत -गरिब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून वैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयात शिक्षणासाठी मदत सुरु करावी. राष्ट्रवादी वेलफेअर सोसायटीच्या वतीने एक कोटी रुपये आम्ही श्री शिवाजी शिक्षण संस्थेला देत आहोत. या रकमेतून वैद्याकीय आणि कृषी अभ्यासक्रमातील प्रत्येकी तीन मुलींना मदत करावी, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Uddhav Thackeray On Bjp : भाजपने बनावट हिंदुऱ्हदयसम्राट बनण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details