महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाची सारिका वनवे ठरली सुवर्णकन्या - लेटेस्ट न्यूज

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी सारिका वनवेला 29 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक जाहीर झाले होते. आज विद्यपीठात आयोजित सोहळ्यात या सुवर्णकन्येला तिचे पारितोषिक बहाल करण्यात आले. सारिका वनवेच्या या यशामुळे विद्यापीठाच्या मराठी विभाच्या यशात मनाचा तोरा रोवला गेला आहे.

सुवर्णकन्या
सुवर्णकन्या

By

Published : Jul 31, 2021, 7:41 PM IST

अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी सारिका वनवेला 29 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक जाहीर झाले होते. आज विद्यपीठात आयोजित सोहळ्यात या सुवर्णकन्येला तिचे पारितोषिक बहाल करण्यात आले. सारिका वनवेच्या या यशामुळे विद्यापीठाच्या मराठी विभाच्या यशात मनाचा तोरा रोवला गेला आहे.

अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाची सारिका वनवे ठरली सुवर्णकन्या

दिव्यांग सारिकाची भरारी
सारिका वनवे ही यवतमाळ जिल्ह्यातील आसोला या छोट्या गावातील रहिवासी आहे. तीचे वडील पोस्टमन आहे तर आई गृहिणी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एम.एड झाल्यावर सारीकाने दोन वर्षांपूर्वी विद्यापीठातील मराठी विभागात पदव्युत्तर अभ्यासाला सुरुवात केली. तपोवन परिसरात भाड्याच्या एका खोलीत राहून तीने विद्यापीठात पायी येऊन शिक्षण पूर्ण केले. दरम्यान तिने सेट आणि नेट दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. विशेष म्हणजे तिच्यातील स्पार्क आणि जिद्द पाहून मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मोना चिमटे यांच्यासह प्रा.डॉ.मनोज तायडे, प्रा.डॉ. हेमंत खडके आणि प्रा.डॉ.माधव पुटवाड यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले.

सारिका वनवे ठरली सुवर्णकन्या

आचार्य पदवी मिळविण्यासाठी करते आहे तयारी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सर्वाधिक सुवर्णपदक पटकविणारी सारिका सध्या आचार्य पदवी मिळावी यासाठी तयारी करते आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा.डॉ.माधव पुटवाड यांच्या मार्गदर्शनात माझा नावासमोर लवकरच डॉक्टर लागेल अशी खात्री सारिका वनवेला आहे.

हेही वाचा -अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details