अमरावती :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ( Sant Gadgebaba Amravati University ) सिनेटची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी 27 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून उमेदवारांना चार नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात या निवडणुकीची धूम ( Amravati division are in frenzy of this election ) राहणार आहे.
4 नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रकाशित :सिलेक्ट निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे 27 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे उमेदवारी अर्ज बाबत दाखल आक्षेप हरकती संदर्भात एक नोव्हेंबरला कुलगुरू आणि कुलसचिवांच्या समोर निवाडा केला जाणार आहे. यानंतर चार नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.20 नोव्हेंबरला मतदानसिनेट निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला सकाळी सात ते पाच या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. 44 सिनेट सदस्य निवडणुकीत एससी, एसटी, एनटी, ओबीसी, संवर्गासह महिला सर्वसाधारण असे आरक्षण राहणार आहे.