महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रस्त्याच्या मधात खोदला खड्डा; दोन परिसरातील रहिवाशांची जुंपली - जिजाऊ नगर परिसर

जिजाऊ नगर परिसरातील राहिवास्यांनी चक्क जेसीबी आणून शेजारच्या तेजस विहार परिसरात जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे दोन परिसरातील रहिवाशांची चांगलीच जुंपली.

अमरावतीत दोन परिसरातील रहिवाशांची जुंपली
अमरावतीत दोन परिसरातील रहिवाशांची जुंपली

By

Published : Dec 19, 2020, 8:12 PM IST

अमरावती - जिजाऊ नगर परिसरातील राहिवास्यांनी चक्क जेसीबी आणून शेजारच्या तेजस विहार परिसरात जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे दोन परिसरातील रहिवाशांची चांगलीच जुंपली. आठ दिवसांपासून रस्ता बंद झाल्याने तेजस विहार परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. या मार्गाने राजुरा परिसरात असणाऱ्या पारधी बेड्यावरून लोक दारू पिऊन येत असल्याने हा रस्ता बंद केला, असे जिजाऊ नगर परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. तर दारू वाल्यांवर कारवाई करा, आमचा रस्ता कोणत्या अधिकारात बंद करता, असा सवाल तेजस विहार परिसरातील रहिवाशांनी केला आहे.

गुंजन गोळे
जिजाऊ नगरमध्ये महिलांचा मोर्चा-मार्डी मार्गावरून थेट जिजाऊ नगर येथून तेजस विहारकडे सध्या कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावर जेसीबी आणून खड्डा खोदल्याने तेजस विहार परिसरातील महिलांचा मोर्चा जिजाऊ नगर परिसरात धडकला. या भागात राहणारे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी तीवारी आणि पोलीस कर्मचारी लांडगे यांनीच हा रस्ता बंद केल्याने त्यांनी काय त्रास होतो याचे उत्तर द्यावे, अशी मागणी महिलांनी केली. यावेळी लांडगे हे घरी नव्हते तर तिवारी यांच्या घरासमोर महिलांनी मोर्चा आणल्यावर तिवारी घराबाहेर आले. त्यांनी रस्ता सुरू होणार नसल्याचे महिलांना सांगितले.

आमदार रवी राणा यांनी केले होते रस्त्याचे भूमिपूजन-

बडनेरा मतदार संघात येणाऱ्या या परिसरात जिजाऊ नगर ते तेजस विहार पर्यंत रस्त्याच्या बामधकामाचे काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी भूमिपुजन केले आहे. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार हे भूमिपूजन बेकायदेशीर आहे.

आम्हीच बुजवणार खड्डा-

तेजस विहार परिसरात देशाच्या सीमेवर राहणाऱ्या सैनिकांची दोन घर आहे. इथे त्यांच्या पत्नी आणि लहान मुलं राहतात. तसेच काही घरातील मुली पोलीस शिपाई आहेत त्यांना रात्रीबेरात्री घरी येण्यासाठी हाच मार्ग सोयीचा आहे. रस्ता बंद करणे योग्य नाही. आम्ही महिलाच आता हा खड्डा बुजवणार, असे तेजस विहार परिसरातील गुंजन गोळे 'ईटीव्ही भारत' शी बोलतांना म्हणाल्या.

हेही वाचा-इफ्फीमध्ये 'सांड की आँख', 'छिछोरे', मराठी 'प्रवास'सह ४३ चित्रपट

हेही वाचा-अपंगत्वावर मात करून स्वत:च्या 'पाया'वर उभा आहे जीम ट्रेनर

ABOUT THE AUTHOR

...view details