अमरावती -जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगाराच्या बसचा इंदोर मार्गावर नर्मदा नदीत कोसळून अपघात ( NarmadaBus Accident ) झाला आहे. महाराष्ट्रातून परप्रांतात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ( State Transport Corporation ) गाड्या सुव्यवस्थेत आहेत का याबाबत अमरावती आगारातील गाड्यांची परिस्थिती ईटीव्हीच्या प्रतिनिधीने जाणून घेतली आहे. अमरावती आगारातील अनेक गाड्या या खराब असल्या तरी परप्रांतात जाणाऱ्या सर्वच गाड्यांची स्थिती अतिशय व्यवस्थित असल्याचे ईटीव्हीच्या निदर्शनास आले आहे.
मध्य प्रदेशातील या शहरांकडे धावतात गाड्या -अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, मुलताई, बऱ्हाणपूरसाठी गाड्या धावतात. याव्यतिरिक्त नागपूर इंदोर ही नागपूर आगाराची गाडी देखील अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून इंदोरला रवाना होते. मध्य प्रदेशात जाणाऱ्या सर्वच बस गाड्या ह्या सुस्थितीत ठेवल्या जातात. या गाड्यांवर जाणाऱ्या चालकांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी देखील घेतली जाते. अमरावती आगारात अनेक गाड्यांची अवस्था हवी तशी चांगली नसली तरी परप्रांतात जाणाऱ्या तसेच राज्यातही लांब पल्ल्यावर धावणाऱ्या सर्वच गाड्यांची योग्य निगा राखली जाते, अशी माहिती आगारातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली आहे.
हेही वाचा -Washim Hijab controversy : विद्यार्थिनींने हिजाब घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला
चालक, प्रवाशांच्या काळजीमुळे हैदराबाद गाडी बंद - अमरावती वरून हैदराबाद साठी नियमित सायंकाळी सहा वाजता अमरावती मध्यवर्ती आगारातून बस सुटायची. कोरोना काळात अमरावती वरून हैदराबादला जाणारी गाडी बंद ठेवण्यात आली ती आजपर्यंत पुन्हा सुरू झाली नाही. या संदर्भात अमरावती आगाराचे प्रमुख जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती वरून हैदराबादला जाणाऱ्या गाडीचा चालक हा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बदलला जातो. मात्र वर्षभरापासून पांढरकवडा आगारातून अमरावती हैदराबाद या गाडीसाठी चालकच उपलब्ध करून दिला गेला नसल्यामुळे अमरावती हैदराबाद या लांब पल्ल्याच्या गाडीवरील चालकाच्या आणि त्याच्यासोबतच गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी सलग अमरावती ते हैदराबाद पर्यंत निर्णय योग्य नाही यामुळेच ही गाडी आताही बंदच असल्याची माहिती आधार व्यवस्थापक जयस्वाल यांनी ईटीव्ही भारतची बोलताना दिली. येणाऱ्या पंधरा दिवसात पांढरकवडा आगारातून अमरावती हैदराबाद या गाडीसाठी चालक मिळण्यासंदर्भात येणारी अडचण सुटण्याच्या मार्गावर असून लवकरच अमरावती वरून हैदराबाद साठी पूर्वीप्रमाणेच प्रवाशांच्या सुविधेत गाडी धावणार असल्याचे जयस्वाल म्हणाले.