अमरावती- राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. परंतु अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच इंजेक्शनच्या काळाबाजार करून, त्याची चढ्या दरात विक्री केली जात आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मागील काही दिवसांपासून हे रॅकेट मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा काळाबाजार करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने काल रात्री ११ वाजता पोलिसांनी बनावट ग्राहक बनून सापळा रचत छापेमारी केली.
सहा जणांच्या मूसक्या आवळून पोलिसांनी केली अटक
काळाबाजार करून विक्री करणाऱ्या मध्ये तिवसा येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे व भातकुली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय राठोड सह ४ खाजगी कर्मचारी अशा एकूण सहा जणांच्या मूसक्या पोलिसांनी आवळून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 रेमडेसिवीर इंजेक्शन सह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या कारवाईमूळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
रुग्णालयातील इंजेक्शनची दहा ते बारा हजार रुपयांत बाहेर विक्री