अमरावती - शहरातील राजापेठ अंडरपासची पाहणी करण्यासाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर तीन महिलांनी अचानक साई फेकल्यामुळे खळबळ उडाली. यावेळी महिलांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.
छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविलाचा निषेध -
राजापेठ उड्डाणपुलावर 12 जानेवारीला आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. मात्र हा पुतळा महापालिका आयुक्तांनी 16 जानेवारीला मध्यरात्री काढून टाकल्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असून यामुळे आम्ही शिवप्रेमी महापालिका आयुक्तांचा निषेध नोंदवतो असे पत्र ही यावेळी देण्यात आले. तर काही आक्रमक महिलांनी महापालिका आयुक्तांच्या दिशेने शाई भिरकावली.
आयुक्त घटनास्थळावरून रवाना -
महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह राजापेठ उड्डाण पुलाची पाहणी करण्याकरीता आलेले महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर साईची बॉटल घेऊन काही महिला धावत आल्या. महापालिका आयुक्तांनी पळ काढला यावेळी आयुक्तांच्या सुरक्षारक्षकाने महिलेला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकाला धक्का देऊन महिला महापालिका आयुक्तांच्या दिशेने धावले आणि त्यांच्या अंगावर शाई फेकली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी महापालिका आयुक्तांना महिलांच्या तावडीतुन सोडवून त्यांच्या वाहनात बसून घटनास्थळावरून रवाना केले.
हेही वाचा -Nana Patole Criticism PM : पंतप्रधानाच्या 'त्या' वक्तव्याविरोधात राज्यात काँग्रेसचे आंदोलन ; नाना पटोलेंची टीका