अमरावती -मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठण्यासाठी गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना 14 दिवसांच्या तुरुंगवासात पाठवण्यात आले आहे. आज (सोमवारी) राणा दाम्पत्याला ( Rana Couple Bail )जामीन मिळेल, अशी अपेक्षा असताना याबाबत न्यायालयाचा ( Mumbai High Court ) निर्णय आला नसल्यामुळे राणा समर्थकांचा ( Rana supporters Amravati ) प्रचंड हिरमोड झाला. याबाबत आमदार रवी राणा यांचे मोठे भाऊ सुनील राणा ( Sunil Rana elder brother of MLA Ravi Rana ) यांनी कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन करत आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
निकालाची आज दिवसभर होती प्रतीक्षा :राणा दांपत्याला त्यांच्या मुंबई येथील घरातून 23 एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज राणा दाम्पत्याला जामिन मिळेल, अशी आशा त्यांच्या कुटुंबियांसह कार्यकर्त्यांना होती. आज सकाळपासूनच राणा समर्थक न्यायालयाची सकारात्मक निकालाची प्रतीक्षा करत असताना न्यायालयाने आपला निर्णय आज राखून ठेवल्यामुळे राणा समर्थकांचा हिरमोड झाला.